डॉ. विनिता आपटे
संपादक
Brief info
डॉ. विनिता आपटे या तेर पॉलिसी सेंटर या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत. तेर पॉलिसी सेंटर ही संस्था पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. जलसंवर्धन, वृक्षाच्छादन वाढविण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. नामांकित कंपन्या आणि स्थानिक संस्थांच्या सहभागातून ही संस्था गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे काम करत आहे. संस्थेने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. कास पठराला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा मान मिळवून देण्यातही तेर पॉलिसी सेंटरचा सहभाग होता.
संस्थेतर्फे मुलांमध्ये पर्यावरण विषयक जागृती करण्यावर विशेष भर दिला जातो. यासाठी मुलांना केंद्रस्थानी ठेवून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. लहान वयात पर्यावरणाचे संस्कार व्हावेत म्हणून विद्यार्थ्यांसाठी तेर ऑलिम्पियाड, पर्यावरणीय खेळांची शिबिरे दर वर्षी आय़ोजित केली जातात. डॉ. विनीता आपटे यांनी स्वतः संयुक्त राष्ट्र संघाच्या पॅरीस येथील कार्यालयामध्ये पर्यावरण विभागात काम केले आहे. डॉ. आपटे यांना २००७ मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्रसंघ ओझोन कृती विभागाच्या खास पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. आपटे यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये गीता आणि पर्यावरण या विषयावर व्याख्यान दिले आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी आय़ोजित करण्यात येणाऱ्या जागतिक हवामानबदल परिषदेत (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज) डॉ. आपटे या सहभागी होतात. या परिषदांमध्ये त्यांनी भारतातील पर्यावरण संवर्धनाचे यशस्वी प्रयोग सादर करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
निसर्गरंग या नव्या उपक्रमातातून निसर्ग आणि पर्यावरणाचे विषय सहजसोप्या मराठी भाषेतून मुलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्या करत आहेत.