डॉ मंदार दातार - निसर्ग रंग

डॉ मंदार दातार

वनस्पती तज्ज्ञ
Brief info

डॉ. मंदार दातार आघारकर संशोधन संस्थेमध्ये वैज्ञानिक आहेत. वनस्पतीशास्त्र हा त्यांचा संशोधनाचा विषय असून, आतापर्यंत त्यांचे ५१ शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिंकामध्ये प्रकाशित झाले आहेत. अनेक परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. आकाशवाणीसाठी निसर्ग आणि पर्यावरण विषयक कार्यक्रमांमध्ये डॉ. दातार यांचा नेहमी सहभागी असतो. याशिवाय नामांकित वृत्तपत्रे, मासिकांमध्ये ते नियमित लेखन करतात. त्यांच्या वनस्पती, विज्ञानविषयक अनेक लेख, कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. देशभरातील विविध निसर्ग परिचय शिबिरांमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून डॉ. दातार सहभागी झाले आहेत. वनस्पती विश्वाचे पैलू उगडणारी पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. निसर्ग सेवक आणि महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या परिसर वनस्पती परिचय अभ्यासक्रमाचे संयोजन काही वर्षे डॉ. दातार यांनी केले आहे.
निसर्गरंगमध्ये डॉ. दातार मुलांना वनस्पती विश्वातील रंजक माहिती सोप्या शब्दात उलगडून दाखवणार आहेत.

error: Content is protected !!