पल्लवी कुलकर्णी
पर्यावरण अभ्यासक
Brief info
शालेय जीवनापासून भटकंतीची आवड असल्यामुळे पल्लवी कुलकर्णी यांना निसर्गाविषयी कुतूहल निर्माण झाले. वन विभागाच्या लहान-मोठ्या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि पुढे याच विषयात करिअर करायचं ठरवलं आणि पर्यावरण शास्त्रामध्ये उच्चशिक्षण घेतले. एका प्रकल्पामध्ये करंज झाडाच्या बियांपासून बायोडिझेल उत्पादनासाठी कोकण आणि सोलापूरमध्ये झालेल्या संशोधनात त्यांनी सहभाग नोंदवला. गणेश उत्सवात निर्माल्य आणि गणेश मूर्तींमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मूर्ती व निर्माल्याचे संकलन करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली. कुलकर्णी यांनी एका खासगी कंपनीत इलेक्ट्रॉनिक उपकरणांची विल्हेवाट लावताना वापरल्या जाणाऱ्या कायद्यांसंदर्भात काम केले .
निसर्गरंग मध्ये पल्लवी मुलांना निसर्गाबद्दल पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.