परिमल दवे - निसर्ग रंग

परिमल दवे

खगोल अभ्यासक
Brief info

व्यवसायाने परिमल दवे सिक्स सिग्मा कन्सल्टंट आहेत. आवड आणि अभ्यास म्हणून परिमल दवे १९९५पासून खगोल निरीक्षण करीत आहेत. गेल्या पंधरा वर्षात त्यांनी खगोल विश्वाबद्दल असलेल्या कुतुहूलाचा सखोल अभ्यास केला आहे. या काळात अवकाश निरीक्षणाबरोबरच, त्यांनी विविध टेलिस्कोप तयार केले आहेत. आकाश निरीक्षण, टेलिस्कोप मेकिंग, अवकाश निरीक्षणासाठी आवश्यक उपकरण निर्मिती या विषयावर ते शाळा, कॉलेज, विविध संस्थांमध्ये नियमित व्याख्याने देतात. त्यांनी टिपलेली सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आणि अवकाशातील विविध घटनांची छायाचित्रे विविध वर्तमानपत्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेबसाइटवर प्रसिद्ध झाली आहेत. देशभरातील खगोलप्रेमींसाठी त्यांनी पाचशेहून अधिक आकाश निरीक्षणाचे कार्यक्रम केले आहेत.
निसर्गरंगमध्ये परिपल दवे आपल्याला खगोल विश्वाची सफर घडविणार आहेत.