धर्मराज पाटील - निसर्ग रंग

धर्मराज पाटील

पक्षी अभ्यासक
Brief info

वन्यप्राणी, पक्षी, निसर्गाबद्दल असलेल्या कुतुहलामुळे धर्मराज पाटील यांनी याच क्षेत्राला करिअर म्हणून निवडले. धर्मराज पाटील वन्यजीव अभ्यासक, संशोधक आणि पर्यावरणविषयक मार्गदर्शक असून, विविध राष्ट्रीय संस्थांशी जोडलेले आहेत. रानावनातले पक्षी आणि फुलपाखरे हा त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय आहे. IUCN या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशन विभागाचे ते सदस्य आहेत. पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ पक्ष्यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. वन पिंगळा या दुर्मीळ पक्ष्याच्या संशोधनादरम्यान या पक्ष्याचे अस्तित्व असलेल्या नवीन वनक्षेत्रांचा पाटील यांनी शोध लावला आहे. महाराष्ट्रातील २५ आणि मध्य प्रदेशातील ८ गावांमध्ये त्यांनी लोकसहभागातून जैवविविधता समित्या स्थापन केल्या असून, गावांची जैवविविधता नोंदवही बनविण्यासाठी मदत केली आहे. पुण्यातील जीवितनदी – द लिव्हिग रिव्हर फाउंडेशनचे ते संस्थापक संचालक आहेत.
निसर्गरंग मध्ये धर्मराज दादा आपल्याला पक्ष्यांच्या अनोख्या दुनियेत घेऊन जाणार आहेत.