अनिकेत कोनकर - निसर्ग रंग

अनिकेत कोनकर

पर्यावरण लेखक
Brief info

मूळचे रत्नागिरीचे असलेले अनिकेत कोनकर कॉलेजमध्ये असल्यापासून विविध विषयांवर लेखन करीत आहेत. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून बीएस्सी अॅग्रीकल्चर ही पदवी घेतल्यावर कोनकर यांनी पत्रकारितेत उच्च शिक्षण घेतले. २००८पासून ते पत्रकारितेत असून, ‘सकाळ’ समूहाचे अॅग्रोवन हे कृषिविषयक दैनिक, तसेच महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून काम केले आहे. २०१७पासून ते Bytesofindia.com या पॉझिटिव्ह मीडिया पोर्टलचे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्य सरकारतर्फे दिला जाणारा २०१८च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने (सोशल मीडिया) त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, पर्यावरण, पर्यटन, भाषा, साहित्य, खाद्यपदार्थ हे त्यांचे आवडीचे विषय असून, यावर ते सातत्याने लेखन करतात. ‘निसर्गरंग’मध्ये ते आपल्याला नद्यांशी संबंधित विविध बाबींची ओळख करून देणार आहेत.