मुलांना केवळ वाचक बनविण्याचा आमचा उद्देश नाही. त्यांनीही त्यांच्या घराजवळ दिसणारी झाडे, फुले, फुलपाखरांचे फोटो काढावेत, एखाद्या घरट्याचे निरीक्षण करावे, त्याबद्दलचे अनुभव लिहावेत, असं आम्हाला वाटतं. आपल्या परिचयात अशी अनेक मुलं आहेत, पण त्यांना ही निरीक्षण कोणाला द्यावीत, फोटो कोणाकडे शेअर करावेत, हे माहिती नसते. मुलांच्या निसर्ग वाचनाच्या उपजत सवयीला निसर्गरंगच्या माध्यमातून निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आम्हाला वाटतो