निसर्गरंग हे व्यासपीठ खरे तर निसर्गाप्रती कुतूहल असलेल्या प्रत्येकासाठी खुले आहे. पण आम्ही प्प्रामुख्याने वय वर्षे ९ ते १३ (इयत्ता चौथी ते सातवी) या वयोगटातील मुलांना केंद्रस्थानी ठेवले आहे. साधारणपणे इय़त्ता चौथीपासून पुढे मुलांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यांना पडणाऱया प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ते प्रयत्न करायला लागतात. निसर्गरंग या पाक्षिकातून मुलांना प्राणी, पक्षी, झाडं, फुलं, मासे, गवत, ग्रह-ताऱ्यांबद्दल पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत. तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञांच्या तांत्रिक भाषेत नव्हे, तर त्यांना आवडेल आणि समजेल अशा सोप्या चित्रमय भाषेत ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविली जाणार आहे. निसर्गाशी संवाद साधण्याची, निसर्ग वाचनाची दृष्टी मुलांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे.