निसर्गरंग का आणि कशासाठी?
मुलं तुम्हाला कधी भन्नाट प्रश्न विचारतात का ?
अशा वेळी तुम्ही काय करता ? बाबा, मासे कधी झोपतात ? आई, सुरवंटाचे पाय एकमेकात अडकत कसे नाहीत ? आई, कोळी त्याच्या जाळ्याला चिकटून बसत नाही का ?

घराघरात मुलांचे हे कुतूहल शमविण्यासाठी, त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या पातळीवर जाऊन सोडविण्यासाठी आम्ही निसर्गरंग या पाक्षिकाची / व्यासपीठाची निर्मिती केली आहे. निसर्गरंग हे व्यासपीठ खरे तर निसर्गाप्रती कुतूहल असलेल्या प्रत्येकासाठी खुले आहे. पण आम्ही प्रामुख्याने वय वर्षे ९ ते १३ (इयत्ता चौथी ते सातवी) या वयोगटातील मुलांना केंद्रस्थानी ठेवून निसर्गरंग या नियतकालिकाचे नियोजन केले आहे.
भूमिका
मुले आणि त्यांचे पालक आम्हाला का निवडतात
तरुण संशोधक
प्राणी, पक्षी, फुले, वनस्पती, नदी, समुद्रापासून अगदी अवकाशातील घडामोडींचा अभ्यास करणारे उत्साही तरुण संशोधक निसर्गरंग या व्यासपीठावर मुलांशी गप्पा मारणार आहेत.

त्यांच्याकडील निसर्ग, पर्यावरण आणि अवकाशाच्या गमतीजमती सहज आणि सोप्या गोष्टींमधून उलगडून सांगणार आहेत.