महाराष्ट्राच्या गवताळ कुरणांना लागणाऱ्या वणव्यात बहुतांश वनस्पती भस्मसात होत असताना त्या वणव्यांमध्ये तगून राहणाऱ्या आणि आगीचा प्रकोप शमल्यानंतर पुन्हा फुलणाऱ्या नव्या वनस्पतींचा शोध नुकताच संशोधकांनी लावला आहे. तळेगाव स्थित वनस्पती अभ्यासक आदित्य धारप आणि पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेमधील डॉ. मंदार दातार आणि भूषण शिगवण यांनी…
नागपंचमी जवळ आली की दुकानांमध्ये नागाची चित्र असलेले देवघरात ठेवता येतील अशी पोस्टर, नागाच्या छोट्या मातीच्या मूर्ती दिसायला लागतात. पूर्वी नागाच्या पूजेसाठी घरोघरी गारुडी येत असत. दारात येऊन ते पेटारा उघडायचे, आपण त्याला दूध द्यायचो, पूजा करायचो, मग पेटारा पुढे दुसऱ्या घरी जात असे. कालांतराने…
डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्या हवामान विज्ञानातील प्रभावी योगदानामुळे आणि विस्तृत संशोधनामुळे त्यांना Shanti Swaroop Bhatnagar Award 2024 हा पुरस्कार देण्यात येत आहे. डॉ. कोल पुण्यातील, इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी (IITM) येथे हवामान शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी जपानमधील होक्काइडो विद्यापीठातून ‘महासागर आणि वातावरणीय गतिशीलता’ या…
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांचे वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आंतरशालेय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. “सृष्टी, वृष्टी आणि मानव” हा स्पर्धेचा विषय आहे. हजार शब्दांची ताकद एका चित्रात असते.चित्रकला, रंगसंगती, आविष्कार, संवादी भाषा, विषयातील नेमकी व…
सह्याद्रीच्या निवडक प्रदेशात, कातळसड्यांवर येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण एकदांडी फुलाच्या संवर्धानासाठी नुकतेच कोकणातील अभ्यासक, संशोधक आणि निसर्गप्रेमी एकत्र आले होते. या फुलांचा अधिवास जपण्यासाठी, त्यांचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय करता येईल, यावर दिवसभराच्या बैठकीत विचारमंथन करण्यात आले. एकदांडी म्हणजेच कोकण दिपकाडी Dipcadi Concanense. ढोकाचे फुल किंवा…
वाघांना वाचविण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी, वाघांच्या अधिवासांना संरक्षण देणे गरजेचे असते. त्याला अपेक्षित वसतिस्थाने, पुरसे खाद्य मिळाले की वाघ त्या प्रदेशाचा स्वीकार करतात, याच उद्देशाने जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांच्या वन्यजीव संशोधन सुविधा विभागाने Sahyadri Wildlife Research Facility नुकतीच “सह्याद्री व्याघ्र भुप्रदेश संवर्धन…