सह्याद्रीच्या निवडक प्रदेशात, कातळसड्यांवर येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण एकदांडी फुलाच्या संवर्धानासाठी नुकतेच कोकणातील अभ्यासक, संशोधक आणि निसर्गप्रेमी एकत्र आले होते. या फुलांचा अधिवास जपण्यासाठी, त्यांचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय करता येईल, यावर दिवसभराच्या बैठकीत विचारमंथन करण्यात आले. एकदांडी म्हणजेच कोकण दिपकाडी Dipcadi Concanense. ढोकाचे फुल किंवा…
