विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग यांचे वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आंतरशालेय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. “सृष्टी, वृष्टी आणि मानव” हा स्पर्धेचा विषय आहे. हजार शब्दांची ताकद एका चित्रात असते.चित्रकला, रंगसंगती, आविष्कार, संवादी भाषा, विषयातील नेमकी व…
सह्याद्रीच्या निवडक प्रदेशात, कातळसड्यांवर येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण एकदांडी फुलाच्या संवर्धानासाठी नुकतेच कोकणातील अभ्यासक, संशोधक आणि निसर्गप्रेमी एकत्र आले होते. या फुलांचा अधिवास जपण्यासाठी, त्यांचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय करता येईल, यावर दिवसभराच्या बैठकीत विचारमंथन करण्यात आले. एकदांडी म्हणजेच कोकण दिपकाडी Dipcadi Concanense. ढोकाचे फुल किंवा…
वाघांना वाचविण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी, वाघांच्या अधिवासांना संरक्षण देणे गरजेचे असते. त्याला अपेक्षित वसतिस्थाने, पुरसे खाद्य मिळाले की वाघ त्या प्रदेशाचा स्वीकार करतात, याच उद्देशाने जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांच्या वन्यजीव संशोधन सुविधा विभागाने Sahyadri Wildlife Research Facility नुकतीच “सह्याद्री व्याघ्र भुप्रदेश संवर्धन…
घराशेजारच्या बागेत, गच्चीमध्ये, गॅलरीमध्ये कुंड्यांमध्ये फुलणारे ब्रह्मकमळ अनेकांना आवडते. पावसाळा सुरु झाला की या झाडाला फुले यालला सुरुवात होते. या ब्रह्मकमळाची फुल रात्री बाराच्या दरम्यान संपूर्ण फुलतात. काही घरांमध्ये तर एकावेळी शंभर दीडशे फुलेही येतात. अशा वेळी आजूबाजूच्या घरांमधील, गल्लीतील लोकं ही फुल बघायला रांगा…
मुंबई, दि. १: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सर्वांच्या…
पावासाळा सुरू झाल्यावर गावकऱ्यांच्या रोजच्या जेवणात काही नवीन भाज्या दाखल होतात. पावसाळी आजारांचा प्रतिकार करण्याचे गुणधर्म या भाज्यांमध्ये असल्याने घरातली मोठी माणसं मुलांना कधी आग्रह तर कधी सक्ती करून या भाज्या खायला सांगतात. अलीकडे या भाज्यांचे महत्व समजल्याने गावातल्या आठवड्याच्या बाजारांबरोबरच शहरांमध्येही रानभाज्या महोत्सव सुरू…