निसर्गरंग NisargaRanga
निसर्ग रंगमध्ये तुमचं स्वागत आहे!
:info@nisargaranga.com

निसर्ग रंग

Slide निसर्गाचे
महत्त्व
मुलांपर्यंत पोहोचवायचे व्यासपीठ आमची महिती

निसर्गरंग का आणि कशासाठी?

मुलं तुम्हाला कधी भन्नाट प्रश्न विचारतात का ?

अशा वेळी तुम्ही काय करता ? बाबा, मासे कधी झोपतात ? आई, सुरवंटाचे पाय एकमेकात अडकत कसे नाहीत ? आई, कोळी त्याच्या जाळ्याला चिकटून बसत नाही का ?

घराघरात मुलांचे हे कुतूहल शमविण्यासाठी, त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या पातळीवर जाऊन सोडविण्यासाठी आम्ही निसर्गरंग या पाक्षिकाची / व्यासपीठाची निर्मिती केली आहे. निसर्गरंग हे व्यासपीठ खरे तर निसर्गाप्रती कुतूहल असलेल्या प्रत्येकासाठी खुले आहे. पण आम्ही प्रामुख्याने वय वर्षे ९ ते १३ (इयत्ता चौथी ते सातवी) या वयोगटातील मुलांना केंद्रस्थानी ठेवून निसर्गरंग या नियतकालिकाचे नियोजन केले आहे.

तरुण संशोधक

प्राणी, पक्षी, फुले, वनस्पती, नदी, समुद्रापासून अगदी अवकाशातील घडामोडींचा अभ्यास करणारे उत्साही तरुण संशोधक निसर्गरंग या व्यासपीठावर मुलांशी गप्पा मारणार आहेत.

त्यांच्याकडील निसर्ग, पर्यावरण आणि अवकाशाच्या गमतीजमती सहज आणि सोप्या गोष्टींमधून उलगडून सांगणार आहेत.

मी निसर्गरंगचे सदस्यत्व कसे घेऊ

निसर्गरंग परिवारात सहभागी व्हा

पालकांचे म्हणणे

आम्हाला मिळालेली प्रशंसापत्रे

पर्यावरण संवर्धनाचे संस्कार मुलांवर लहानपणीच झाले पाहिजेत. यासाठी त्यांना सहज सोप्या भाषेतून निसर्ग म्हणजे काय हे आधी कळाले पाहिजे. जर त्यांना निसर्गाबद्दल आकर्षण वाटले तर नक्कीच ते त्याला वाचविण्यासाठी पुढे येतील. म्हणूनच मी निसर्गरंग या उपक्रमात माझा मुलगा गंधार याला सहभागी केले आहे.

अश्विनी फणसळकर

अश्विनी फणसळकर

पालक

माझा मुलगा अवनीश याला निसर्गात फिरायची आवड आहे, त्याला वन्यप्राणी, पक्ष्यांबद्दल कुतूहल आहे. निसर्गरंगच्या माध्यमातून त्याला त्याच्या आवडत्या विषयाची माहिती मिळणारे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हा उपक्रम ऑनलाइन असल्याने त्याला वाटेल त्यावेळी तो लॉगइन करुन अंक वाचू शकणार आहे.

महेश इनामदार

महेश इनामदार

पालक
error: Content is protected !!