मुलांसाठी, निसर्गासाठी, मराठीसाठी
निसर्गरंग हे खास लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेले व्यासपीठ आहे. मुलांमध्ये निसर्ग संवर्धनाचे बीज रुजविण्यासाठी सुरू केलेला हा एक अनोखा उपक्रम आहे — जिथे जंगल, प्राणी, पक्षी, पाणी आणि पर्यावरण यांच्याशी मराठी भाषेतून ओळख होते.
जागतिक तापमान वाढ, हवामान बदल आणि समुद्राची वाढती पातळी आता घरोघरी पोहोचले आहेत. पण पर्यावरण रक्षणात नेमके काय करावे, हे सांगणे कठीण असते. भावी पिढीवर बालपणीच योग्य संस्कार झाल्यास ते अधिक जबाबदारीने निर्णय घेतील.
लहानपणी मनावर उमटलेल्या गोष्टी आयुष्यभर स्मरणात राहतात. निसर्गाशी मैत्री बालपणातच घडवणे हे आमचे ध्येय आहे.
आजी-आजोबांच्या गोष्टींसारखी सहज भाषा वापरून आम्ही पर्यावरणाचे अंतरंग मुलांपर्यंत पोहोचवतो.
जंगल, प्राणी, पक्षी, किडे, पाऊस, पाणी, समुद्र — सर्व विषयांची रंजक आणि शास्त्रीय माहिती मराठीत.
निसर्गरंगच्या या विशेष टीमने मुलांसाठी निसर्ग शिक्षणाचे हे अनोखे व्यासपीठ उभे केले आहे.